कल्याण-पुणे-कल्याण
सध्या कामा निमित्त पुण्याच्या खेपा खूपच वाढल्या आहेत. पुण्यात १०-१०.३० पर्यंत पोहोचायच असल्यास इंद्रायणी खूपच लवकर होते आणि डेक्कन खूपच उशिरा आणि रटाळ देखील. ह्याचा सुवर्णमध्य काढायचा असेल तर इंटर सिटी किंवा विशाखापट्टणम पकडायची. पण इंटर सिटी कल्याण ला थांबत नसल्याने मग ७.१० ची कर्जत पकडायची आणि कर्जत ला इंटर सिटी. विशाखापट्टणम ला सध्या ३० जून पर्यंत ट्रायल हॉल्ट दिला आहे.. नाही त्र ह्या दोन्ही .फक्त सिग्नल असेल तरच कल्याण ला थांबतात.. (ही माहिती दिल्या बद्दल तुम्ही माझे आभार मानले असातीलच )
ह्या प्रवासात बदलापूर ते वांगणी चा परिसर सकाळी खूपच छान वाटतो. डावी कडून वाहणारी आणि आत्ता देखील खूप पाणी असणारी नदी आणि उजवी कडे मलांग गड आणि त्या नंतरची माथेरान ची पर्वत रांग.. सुंदर.. आणि सध्या याच बरोबर किंडल (ई बुक रीडर) मधील एखाद्या छानश्या पुस्तकाची साथ.. म्हणजेच ऑसम कॉम्बिनेशन... सध्या उन्हाळा आणि चैत्राचि रांगोळी खूपच विशिष्ट आहे.. जाळलेली शेत जमीन आणि माळरान आणि त्या बरोबर चैत्र पालवी फुटलेली झाडे..
पुढे कर्जत नंतर पळसधरी ला उजवी कडे लागणारी आमराई.. आणि घाटाचा परिसर तर सगळ्यांना माहीतच आहे.. डावी कडे येणारा राजमाची किल्ला आणि नंतर येणारी उल्हास व्हॅली... राजमाची दिसला कि न चुकता २०१३ मधील होळीच्या फुल्ल मून नाइट ट्रेक ची आठवण येते.. उतरताना अवस्था खूपच बिकट झाली होती.
संध्याकाळी परततांना बरेचदा इंद्रायणी नेच बरेचदा प्रवास होतो.. एकतर पुण्याहून थेट किंवा लोणावळा येथून.. भोसरी किंवा चिंचवड येथे मीटिंग असेल तर इंद्रायणी च्या आधीची लोणावळा लोकल पकडायची .

हे सर्व मला अनुभवायच आहे... अधिक वेळ घालवुन... आणि ते आता रॉयल एन्फिल्ड आल्या मुळे शक्य होणार आहे.. नवीन रस्ते.. जे एन.एच. नाहीयेत.. गावातून खेड्या पाड्या तून जाणारे.. बघुया कधी जमतय ते..
तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा.. नेहेमीचे रस्ते सोडून वेगळ्या वाटेने जाण्याचा.. खूप संस्मरणीय असेल ते..
Very nice
ReplyDelete