हिमालयाच्या कुशीत - २
ऋषिकेश
सहा वाजे पर्यंत एअरपोर्ट ला पोहोचलो.. सर्व सोपस्कार पूर्ण करून साडेसहा पर्यंत स्थिरस्थावर झालो. आमचे विमान व्हाया दिल्ली होतं. वेळेत म्हणजे साधारण सव्वा बारा च्या सुमारास जॉली ग्रँट - देहरादून येथे पोहोचलो. वातावरण जरा ढगाळ होतं.. आम्हाला ऋषिकेश हून गोविंद घाट ला घेऊन जाणार्या ट्रान्स्पोर्टरलाच आम्ही गाडी पाठवायला सांगितली होती... एर्टिगा.. एअरपोर्ट ते ऋषिकेश वीस एक किमी अंतर आहे.. रस्त्याच्या दुतर्फा गर्द झाडी..कुठल्या तरी नॅशनल पार्क चा भाग होता.. "एलिफंट क्रॉसिंग झोन" असे बोर्ड लिहिलेले होते..आपले पूर्वज ही भरपूर प्रमाणात होते ... जॉली ग्रँट ते ऋषिकेश हा साधारण मैदानी प्रदेश आहे.. एक पाऊण तासात आम्ही आमच्या "ओयो- द शिवाय" या हॉटेल वर पोहोचलो.. लक्ष्मण झूला रोड वर आमचे हॉटेल होते.. चेक इन करून थोडा आराम झाल्यावर दोन च्या सुमारास जेवण्यासाठी खाली उतरलो..
आम्हाला टिपिकल धाबा स्टाइल हॉटेल मध्ये जेवायचे होते..चौकशी केल्यावर लक्ष्मण झुल्या जवळ चांगली हॉटेल्स आहेत असे कळले.. आमचे हॉटेल जरा उंचावर होते... तिथून लक्ष्मण झूला म्हणजे थोडा उतारा वर होता.. दुपारची वेळ असल्यामुळे तशी वर्दळ कमीच होती..दुतर्फा हॉटेल्स आणि शॉपिंगची दुकानं.. एकंदरीत पाश्चीमात्य लोकांचा बर्यापैकी वावर असेल असे जाणवत होते.. थोडे खाली उतरल्यावर बरीच हॉटेल्स होती.. मग जरा पुढे आल्यावर एक हॉटेल दिसले.. थोडेसे अघळ पघळ.. बाहेर तंदूर..गर्दी कमी.. खात्री पटली.. हेच ते हॉटेल.. तिथे डाल मखनी-छोले .भटूरे-रोटी-आलु पराठे असा आम्हाला हवा असलेला मेनु मिळाला..इथे एक विशेष म्हणजे.. कांदा-प्याज मागितल्यावर कांदा इथे म्हणजे एक लक्झरी आहे असे लक्षात आले..त्या मुळे ओनियन सलाड ऑर्डर करावे लागले.. साधारण ३.३०-३.४५ पर्यंत जेवण झाल्यावर आम्ही लक्ष्मण झुल्याकडे निघालो..
लक्ष्मण झूला जसजसा जवळ येऊ लागला तसे दिसू लागले गंगेचे विशाल पात्र.. पावसाळा असल्या मुळे पाणी तसे गढूळ आणि प्रवाह जोरदार होता.. लक्ष्मण झूला हा खरोखर झूला आहे.. झुलता पूल.. दोन्ही कडे बांधलेला.. आम्ही जिकडे होतो ती तपोवन आणि पलीकडे स्वर्ग आश्रम.. लक्ष्मण झूला च्या (पलीकडच्या) दोन्ही बाजूस ऊंच च ऊंच देवळे दिसत होती आणि घाट..घाटाच्या वरील बाजूस घरे.. हॉटेल्स इ आणि ह्या सगळ्यांना कुशीत घेणारे पर्वत.. संध्याकाळी गंगा आरती बघायला येऊ असे ठरवले.. झुल्यावरून दुचाकींना परवानगी होती.. त्यामुळे स्कूटर-बाइक वाले बरेच जण होते..फोटो सेशन करणारे अबाल-वृद्ध आणि देशाच्या प्रत्येत प्रांतातून आलेले लोक दिसत होते.. पलीकडच्या बाजूस बाजारपेठ बरीच मोठी होती..
वातावरण अजुन दमटच... वारा पण तसा पडलेलाच... साधारण ४.३० च्या सुमारास परत फिरलो.. परत हॉटेल ला यायचे म्हणजे मिनी ट्रेक चाच प्रकार होता.. वर येई पर्यंत जो काही घामटा निघालाय... अगदी आपल्याकडे असतो तसाच.. रूम वर आल्यावर तिघांनी ताणून दिली... पहाटे साडे तीन - चार ला उठल्या मुळे थकवा पण आला होता.. जाग आली तर सात वाजून गेले होते.. रूम च्या बाहेर आलो तर गंगा आरती चे सूर कानावर पडत होते आणि मगाशी दिसलेले ते उंच देऊळ आता रोषणाई मुळे अजुनच सुंदर दिसत होते.. आणि संधी प्रकाशा मुळे एक वेगळाच आसमंत तयार झाला होता..
दुसर्या दिवशी १८ तारखेला आम्हाला ६.३० वाजता गोवींदघाट साठी निघायचे होते..ट्रान्सपोर्टर कडून बोलरो, मॅक्स किंवा ट्रेवलर गाडी येणार होती.. ग्रूप पैकी काही मेम्बर्स ऋषिकेश ला तर काही हरिद्वार ला थांबले होते.. ऋषिकेश च्या मेम्बर्सशी फोन वर बोलून दुसर्यदिवशी आम्ही इनोव्हा नि जायचं ठरवलं.. मुंबईचेच एक मि. आणि मि. पांडे आणि नेहा पहरिया हे लोक होते..सर्वांशी बोलून इनोव्हा नि साडेसहा वाजता निघायचे ठरले.. मागून एक श्री. नरसिंहा आणि कुटुंब हे बेंगलोर हून आलेले ३ जण होते.. पण तो पर्यंत इनोव्हा फुल्ल झाली होती.. त्यामुळे त्यांना हरिद्वार हून येणार्या ग्रूप ला जॉइन व्हायला लागणार होतं..
साडेसात पर्यंत खाली उतरलो... अजुन गारवा तर नव्हता पण आता वारा होता.. आम्ही झुल्याच्या पलीकडील बाजूस गेलो आणि बाजार पेठेत फिरलो..योगा सेंटर चे बरेच बोर्ड्स दिसत होते.. सर्व गोरे लोक बहुतेक योगा मुळेच ऋषिकेश मध्ये तंबू ठोकून होते.. एक सीसीडी पण होते.. तिकडे थोडा टाइम पास केला-कॉफी.. घरी व्हॉटसअॅॅप कॉल्स इ. प्रकार झाले..
परत फिरल्यावर आता गारवा आला होता... झुल्यावर परत येई पर्यंत सर्व शांत झाले होते.. झुल्यावर थोडी रोषणाई होती .. बाकीचे दिवे गेले होते पण झुल्यावर मिण मिण प्रकाश होता .. मधोमध आल्यावर खूपच छान वाटत होते.. चंद्राच्या प्रकाशात पाण्याचा प्रवाह... गार वारा..खळखळत्या पाण्याचा आवाज..... एक वेगळीच वातावरण निर्मिती झाली होती... खूप भारी वाटत होतं..अदभुत..इथे वीस एक मिनिटे आम्ही होतो.. असं वाटत होतं की अजुन थांबावं.. पाय निघत नव्हता..
नऊ पर्यंत हॉटेल वर येऊन तिथेच जेवण झाले. त्यानंतर पान खाण्यासाठी बाहेर पडलो पण बरेच फिरून झाल्यावर पण पानाची गादी काही दिसली नाही.. मग एके ठिकाणी बासकीन्स चा स्टॉल होता.. तिथे आईसक्रिम खाऊन साडे दहाच्या सुमारास रूम वर परत आलो आणि आडवे झालो..ढारा ढूर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र.....
क्रमश:

No comments:
Post a Comment